शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१८ डिसेंबर) :- भोसरी येथील डायनोमर्क कंपनीत गेल्या बारा वर्षापासून दत्त जयंती साजरी करण्यात येते, दत्त मंदीराचा परीसर स्वच्छ करून घेतला नंतर दत्तमंदीरावर आकर्षक विद्यूत रोषनाई करण्यात आली. जन्मोत्सव वा निमित्त भगवान दत्त यांच्या वर नामघोषामध्ये पुष्पवृष्टी करण्यात आली.दत्ताची विधीवत पुजा ,होमहवन व आभिषेक ,कंपनीच्या संचालिका सौ.आमिता राऊत व व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत यांच्या हस्ते करण्यात आली.दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी उत्पादन बंद ठेवुण कंपनीत मशीनवरीची व सभोवतालच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली असे मनुष्यबळ विकास प्रमुख सुर्यकांत मूळे यांनी सांगितले.
किशोर राउत म्हणाले की आम्ही करोना काळातही सर्व कामगारांची विशेष काळजी घेतली. व्यवसायाबरोबरच धार्मिक सलोखा व कामगारांच्या कौटुंबियाशी कौटुंबिक नाते ही आम्ही जपत आलो आहोत यापुढे जपणार आहोत. कामगारासाठी ताणतणाव मुक्त जिवन,आईच्या काळजातुन असे समाजप्रबोधन ही केले जाते आस्थापना माझी नसून सर्व कामगारांची आहे. कामगार पण एकदिलाने काम करत आसतात.वर्षभर विविध समाजप्रबोधनाचे,कार्य आम्ही करत आसतो.
यावेळी गुणवंत कामगार आण्णा जोगदंड यांनी कामगार कुटुंबीयांना उत्पादना बरोबरच दताच्या श्री श्रीपाद वल्लभ,नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ. या तिन्ही आवतारारांची माहिती दिली.नव्याने ओमायक्रान व्हेरीएंट झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाची माहिती जोगदंड यांनी दिली.काळजी घेण्याचे आवाहन केले.व सर्व कामगारांनी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, नियमाचे पालन करून नवीन वर्ष साजरे फक्त कुटुंबासोबत समवेत राहूनच साजरे करण्याचे आव्हान केले,कामाशिवाय गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
कंपनीत दिवसभर स्पिकरद्धारे भक्ती गिते सादर केली.आपल्या कंपनीतील प्रत्येक कामगाराच्या कुटंबियांना आपलीच कंपनी आहे असे वाटते म्हणुन दत्त जयंति निमीत्त सर्व कामगारांना पण स्नेहभोजन भोजन देण्यात आले .यामुळे कंपनीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.उत्पादन करत असताना प्रत्येक विभागान कोरोना चीे काय काळजी घ्यावी मानवसंसाधन विभाग प्रमुख सुर्यकांत मुळे यांनी कामगराना सांगितले.
यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर राउत.सूर्यकांत मुळे सौ आमिता राऊत,गुणवंत कामगार आण्णा जोगदंड,विभाग प्रमुख, प्रविण बाराथे,मोहन कृष्णन,,केतकी राऊत,आक्षरा राऊत,राजेश वैद्य ,दिलीप ईधाते ,प्रिया देशमुख, हेमंत नेमाडे ,यांनी जातीने लक्ष देत होते.राजेंद्र गोराने,प्रिया देशमुख यांनी परीश्रम घेतले. यावेळी सहकारी महीलांनी दत्तमंदिरासमोर आकर्षक रांगोळी काढली होती.