शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२४ डिसेंबर) :- पिंपरी चिंचवड शहरातील रावेत, किवळे, विकास नगर परिसरातील युवानेते बापु कातळे यांच्यावतीने प्रभाग क्रमांक 16 मध्ये बापदेव नगर ,सिद्धिविनायक कॉलनी या भागात संकल्प सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.या समारंभात हजारो महिलांनी सहभाग घेऊन हा हळदीकुंकू समारंभ चा कार्यक्रम यशस्वी केला याबद्दल आयोजक युवानेते बापु कातळे यांनी सर्व महिलांचे आभार व्यक्त केले.
आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महिला भगिनी युवक-युवती व बालकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविणार असून यापूर्वीही अनेक असे उपक्रम राबविण्यात आले आहे .यामध्ये आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, नोकरी महोत्सव, बाल जत्रा असे अनेक कार्यक्रम आपण राबविली असल्याचे यावेळी युवानेते बापू कातळे यांनी सांगितले. तसेच, भविष्यकाळातही आपण या प्रभागातील नागरिकांना महानगरपालिका वतीने उत्तम सुविधा मिळाव्यात याकरिता नेहमी प्रयत्नशील राहू, तसेच प्रभागाच्या विकास कामासाठी सक्षमपणे प्रभागातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे युवानेते बापु कातळे यांनी यावेळी सांगितले.