शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
जुनी सांगवीतील पवार नगर, गल्ली क्र. २ मधील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण काम ठेकेदारांकडून संत गतीने सुरू आहेत. हे काम जलद गतीने व्हावे, अशी मागणी या भागातील माजी नगरसेवक हर्षल ढोरे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
त्यांनी निवेदनात नमूद केले आहे कि, २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रभाग क्रमांक ३२ मध्ये अनेक रस्त्यांचे सिमेंट काँक्रीट करण्याचे काम करण्यात आले आहे. परंतु जुनी सांगवीतील पवार नगर, गल्ली क्रमांक २ मधील रस्त्याचे गेल्या सहा महिन्यापासून काम पूर्ण केले जात नसल्यामुळे या गल्लीमध्ये राहणारे रहिवासी आणि ये-जा करणारे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. या भागाचे लोकप्रतिनिधित्व मी करत असल्याने नागरिकांच्या मागणीनुसार, पवार नगर गल्ली क्रमांक २ मधील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या कामाला शासनाने गती द्यावी, सहा महिन्यापासून अधिक काळ झाल्याने या रस्त्याचे आतापर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. तसेच ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे भर पावसात या भागातील रहिवाशांना तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
तरी सदरील काम लवकरात लवकर करण्याची मागणी माजी नगरसेवक हर्षल ढोरे यांनी केली आहे. तसेच येत्या काही दिवसात संबंधित रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास नागरिकांच्या प्रश्नांसाठी आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल व संत गतीने काम करून नागरिकांचे अडचणीत भर पाडण्याचे कटकारस्थान रचणाऱ्या ठेकेदारावर ही महापालिका प्रशासनामार्फत योग्य ती कारवाई करावी, जर ठेकेदारांनी जाणून बुजून काम करण्यास उशीर केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशीही मागणी मा. नगरसेवक हर्षल ढोरे यांनी केली आहे.