शबनम न्युज : पुणे (दि.३१ डिसेंबर) :- भीमा कोरेगाव शहिदांना मानवंदना अर्पण करण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे 1 जानेवारी 2022 रोजी भीमा कोरेगाव येथे सकाळी 11.30 वाजता उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर 12 वा. ते वढू बुद्रुक येथे जाऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करणार आहेत.
उद्या सकाळी ते जयस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 1818 साली शहीद झालेल्या क्रांतिकारकांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.
भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 1818 साली घडलेल्या ऐतिहासिक क्रांतिकारक घटनेमुळे दलित पीडित व शोषित घटकाला जातीय दास्यातून मुक्त करण्यासाठी प्रेरित केले असून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीसाठी या घटनेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खूप महत्वाचे म्हटले आहे, असे मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या दिवसाच्या पार्श्वभूमीवर सांगितले आहे.