शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (०१ जानेवारी २०२२) :- काल दुपारी ऐश्वर्यम हमारा सोसायटी गेट समोर दीड वर्षाच्या मुलाचा टँकरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला . या अपघाताची कल्पना सोसायटी मधील काळे काकांनी नगरसेविका अश्विनीताई संतोष जाधव यांना दिल्यावर दहा मिनिटाच्या आत जनसेवक संतोषतात्या जाधव या ठिकाणी जाऊन या अपघाताची माहीती मनपा आयुक्त राजेश पाटील साहेब यांना देऊन बिल्डर करत असलेल्या मनमानीची माहीती दिली . त्यानंतर बांधकाम परवानगी विभागाचे अधिकारी मोहीते साहेबांना सांगुन सोसायटी गेट जवळील सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता चालु असलेले बांधकाम बंद करण्यास भाग पाडले.
आज या सोसायटी परिसरातील नागरिकांनी बिल्डरच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेऊन सोसायटी गेट जवळ आपल्या समस्यांचा पाढा स्थानिक नगरसेवक वसंत बोराटे, जनसेवक संतोषतात्या जाधव , मा.नगरसेवक धनंजय आल्हाट तसेच प्रभागातील इतर सामाजिक कार्यकर्ते यांच्यासमोर मांडला. यापुर्वी ही नगरसेविका अश्विनीताई संतोष जाधव यांनी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन ऐश्वर्यम हमारा परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास सांगीतले असून येणाऱ्या सोमवारी सायं ६वा. मनपा अधिकारी व बिल्डर ला घेऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्या संदर्भात मिटींग लावली असून या सोसायटीमधील नागरिकांच्या सर्व समस्या सोडविणार आहे . आज या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले असता मा.नगरसेवक धनंजय आल्हाट, नगरसेवक वसंत बोराटे , जनसेवक संतोषतात्या जाधव व चिखली मोशी फेडरेशन चे संजीवन सांगळे यांनी नागरिकांना शांत करुन महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याशी बोलणे करून दिले. तसेच संबंधीत बिल्डरवर कारवाई करण्यास सांगीतले .