शबनम न्यूज : पुणे (दि.०३ जानेवारी) :- पुण्यातील डॉ. बाळकृष्ण दिगंबर दामले निर्मित ‘ कोविड समय का बावर्ची’ या हिंदी लघुपटाची नॅशनल शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन मध्ये प्रशंसा झाली.
मुंबई विद्यापीठ आणि भारतीय स्त्रीशक्ती यांच्यातर्फे संयुक्तपणे ही राष्ट्रीय लघुपट स्पर्धा भरवण्यात आली असून ‘ब्रेकिंग जेंडर स्टीरिओटाइप ‘हा या स्पर्धेचा विषय आहे .कोविड साथीच्या, लॉक डाऊन काळात स्वयंपाक घरात आलेली स्त्री – पुरुष समानता या लघुपटात मांडण्यात आली आहे .परीक्षकांनी या संकल्पनेचे कौतुक केले.
या लघुपटामध्ये मनीष खडीलकर, रस्मिता शहापूरकर ,राजेश शहापूरकर ,युक्ता शहापूरकर यांनी भूमिका केल्या आहेत. छायांकन आणि ध्वनी व्यवस्था विद्यानंद यांची आहे. दिग्दर्शन मोहिनी दामले यांचे आहे .संपादन राजेश देशमुख यांनी केले आहे.