शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०४ जानेवारी) :- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सौ.शितलताई धनंजय वर्णेकर यांचा सन्मान करण्यात आला.
सोमवार दि. ०३/०१/२०२२ रोजी रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड येथे सदर पुरस्काराचा कार्यक्रम पार पडला. कोरोना काळामध्ये समाजातील गरजू लोकांना अन्नधान्य वाटप व अतिवृष्टीमुळे झालेल्या कोल्हापूर येथील ६०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप तसेच रत्नागिरी चिपळूण येथे ५०० परिवारास अन्नधान्य वाटप व गरजू वस्तूंचे वाटप असा सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी सौ.शितलताई धनंजय वर्णेकर यांची सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
रामकृष्ण मोरे सभागृह येथे आय ए एस ऑफिसर सौ.भाग्यश्री बानायत सी.ई.ओ-श्री साईबाबा शिर्डी संस्थान, श्री श्रीरंग आप्पा बारणे खासदार मावळ, सौ.माई ढोरे महापौर पिं.चि.महानगरपालिका पिंपरी चिंचवड , अतिरिक्त पो.कमिशनर श्री.राजेंद्र शिंदे, प्रथम महिला महापौर अनिताताई फरांदे , माजी महापौर अर्पणाताई डोके, सावता परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री.कल्याणकाका आखाडे तसेच आजी माजी नगारसेवक व इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण सभारंभ संपन्न झाला. समाज व देश हिताचे कार्य करणार्याव व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. कोरोंना काळात सौ.वर्णेकर यांनी खूप उल्लेखनीय कार्य केले आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त खर्याय अर्थाने हे कार्य उल्लेखनीय आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पूर्ण आयुष्य स्री शिक्षणा साठी वेचले व स्रीयांना सक्षम केले. मुलांना व मुलींना समान शिक्षणाच्या संधी मिळाल्या असे यावेळी भाषणात सी.ई.ओ सौ.भाग्यश्री बानायत यांनी संगितले. सदर पुरस्कारासाठी महात्मा ज्योतिबा फुले मंडळाचे अध्यक्ष श्री हणमंत माळी(यादव) व त्यांचे सर्व सहकारी यांचे विशेष सहकार्य लागले.