शबनम न्युज | बुलढाणा (वृत्तसंस्था)
महाराष्ट्र राज्यातील बुलढाण्याच्या प्रथमेश जवकार याला चीनमध्ये सुवर्णपदक मिळाला आहे. चीन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी मध्ये सुवर्णपदक पटविणाऱ्या प्रथमेशला स्वतः जिल्हा अधिकारी किरण पाटील यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाने देखील प्रथमेशचे कौतुक केले आहे.
प्रथमेशने देशासह जिल्ह्याचे नाव क्रीडा क्षेत्रात सुवर्ण अक्षराने नोंदविले आहे. यासोबत एक रोप्य एक कांस्यपदकाची कमाई त्याने केली आहे. जागतिक क्रमवारीत त्यांनी पहिला क्रमांकाचे ध्येय आहे.
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा चीनमधील हांगझोई येथे सुरू आहे. या स्पर्धेत धर्मविद्या (आर्चरी) स्पर्धेच्या कंपाउंड राउंड मध्ये सांघिक प्रकारातील सुवर्णपदक मिळवित आलमपूर जिल्हा बुलढाणा येथील प्रथमेश समाधान जवकार याने ऐतिहासिक कामगिरी केली.