शबनम न्यूज | पुणे
प्रतिनिधी | मोसमी केवट
पुण्यात कोयत्याचा घाक दाखवून बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्या नराधमास पोलिसांनी अटक केले आहे. ही घटना 8 ऑक्टोंबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली.या घटनेप्रकरणी 23 वर्षीय फिर्यादी महिलेने चिंचवड येथे तक्रार दाखल केले आहे.
अविनाश कुसाळकर (वय 31 वर्षे) असे आरोपीचे नाव असून तो राम मंदिराजवळ, मोहननगर पिंपरी पुणे येथे राहणारा आहे. आरोपी हा फिर्यादी यांच्या अनधिकृतपणे घरात घुसून फिर्यादी यांचे तोंड दाबून कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या मुलींना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी आरोपीस भा. द. वि. कलम 376, 511, 427, 450, 506 भारतीय हत्यार कायदा कलम 4 ( 25), महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 37 (1) सह 135 अंतर्गत आरोपीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.