शबनम न्यूज : मुंबई (दि.०५ जानेवारी) :- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित दफनभूमी प्रश्नी मार्गी लावण्यासाठी टिळक भवन दादर येथे आयोजित आढावा बैठकीत पिंपरी चिंचवड शहरातील अल्पसंख्यांक समाजातील विषय मांडत असताना मुस्लिम समाज साठी दफनभूमी साठी जागा उपलब्ध करण्यात यावे , या मागणीसाठी आज मा. मंत्री व काँग्रेस चे प्रदेश कार्याध्यक्ष मा.आरीफ नसीम खान यांना पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे वतीने निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी मा. मंत्री श्री.बसवराज पाटील, प्रदेश सचिव मा. सचिन भाऊ साठे, मा. महिला अध्यक्षा सौ. श्यामला ताई सोनवणे, अल्पसंख्यांक अध्यक्ष शहाबुद्दीन एम.शेख कार्याध्यक्ष अॅड अनिरुद्ध कांबळे, मा. दिलीप पांढारकर, प्रदेश युवक सरचिटणीस मा. मयुर जैस्वाल, शोभा ताई पगारे शहर उपाध्यक्ष मा. मकरध्वज यादव उपस्थित होते.
Advertisement