शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०५ जानेवारी) :- प्रभाग क्र . २८ मधील बी.आर.टी.एस मार्गातून होणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांची वाहतूकीमुळे बी.आर.टी.एस मार्गात अपघाताचे प्रमाण खुप वाढले आहे .
प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षेहेतू नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आपल्या लेखी निवेदनात प्रभागातील सर्व बी.आर.टी.एस चौकात पालिके मार्फत सुरक्षारक्षक नेमनेबाबत विनंती केली आहे, जेणेकरून बी.आर.टी. एस मार्ग मधून इतर वाहनांना वाहतुकीपासून मज्जाव करता येईल परिणामी सतत होणारे जीवघेणे अपघात टाळता येतील.
Advertisement