शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१२ जानेवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत परिसरात विकास नगर येथील वाहतुकीसाठी असलेले रस्ते खराब झाले जागोजागी रस्त्यावर खड्डे पडले त्यामुळे येथील वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. सामान्य नागरिकांना येण्या-जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती.
मोठी वाहने तसेच लहान वाहने यांना रस्त्यावरील खड्ड्यांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत होता या सर्व परिस्थितीची माहिती परिसरातील युवा नेते निलेश तरस यांना मिळाली असता त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीची महानगरपालिका वतीने त्वरित दखल घेण्यात आली व या परिसरातील रस्ता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. ही रस्ता दुरुस्तीची कामे होत असताना युवा नेते निलेश तरस यांनी स्वतः उपस्थित राहून कामाची पाहणी केली.
तसेच रस्ते योग्यप्रकारे दुरुस्त व्हावे याकरिता संबंधित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले संपूर्ण रस्ते दुरुस्त होईपर्यंत निलेश तरस यांनी आपली उपस्थिती दर्शवित सामान्य नागरिकांना वाहतुकीसाठी चांगला रस्ता व्हावा याकरिता प्रयत्न केले.
आपण नेहमीच प्रभागातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असतो सामान्य नागरिकांच्या अडचणी तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने परिसरातील नागरिकांना योग्य सोयी-सुविधा पुरविण्यासाठी नेहमीच आपण प्रयत्नशील असतो असे यावेळी युवा नेते निलेश तरस यांनी सांगितले त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी मित्र कार्यकर्ते उपस्थित होते.