शबनम न्यूज : पुणे (दि.१७ जानेवारी) :- डाॅ.मधुसूदन घाणेकर हे संपूर्ण आयुष्यभर सातत्याने सर्व विश्वावर प्रेम करत आले आहेत,त्यांच्यातील माणुसकीचा धर्म नक्कीच वाखाणण्यासारखा आहे.त्यांना प्राप्त झालेली विश्वमहात्मा उपाधि लोकमान्य आहे.या अधुनिक संताचा आदर्श सा-या विश्वाने आचरणात आणण्यासारखाच आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि साहित्यिक मंदाताई नाईक यांनी केले.
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना नुकतीच,काही राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय संस्थांकडून विश्वमहात्मा ही आंतराष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च उपाधि प्राप्त झाली याबद्दल तारांगण,पुणे संस्थेतर्फे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा मंदाताई नाईक यांच्या शुभहस्ते,महर्षी व्यास पुरस्काराने सन्मानित करण्यात आला, याप्रसंगी नाईक बोलत होत्या.प्रारंभी संस्थापक,अध्यक्षा डाॅ.तारा चौधरी यांनी प्रास्ताविक आणि अतिथी स्वागत केले.प्रा.नीना देसाई यांनी सूत्रसंचालन केले.
कृष्णाई इंटरनॅशनलच्या संस्थापक, अध्यक्षा ड.ज्योतिष पंडीत शुभांगी यांच्या शुभहस्ते डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.या विश्वमहात्म्याच्या उच्च आदर्शवादाचे प्रत्येकाने आपल्या मनमंदिरात करावे, असे डाॅ.घाणेकर यांच्याविषयी ॲड.शुभांगी यांनी गौरवोद्गार काढले.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवाकर घोटीकर,सुप्रसिध्द हायकूकार दीपा पराडकर,कवयित्री नयना पवार यांचीही डाॅ.घाणेकर यांच्या गौरवपर भाषणे झाली.याप्रसंगी सौ.मेघना मधुसूदन घाणेकर यांचाही मंदाताई नाईक यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
महर्षी व्यासांच्या लेखणीच्या प्रेरणेतून समाजपरिवर्तनासाठी वास्तववादी लेखन निश्चितच सत्कारणी लागत असल्याचे,डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. ज्ञानेश्वर माऊलींची विश्वकल्याणाची संकल्पना तसेच दत्तसंप्रदायाची अध्यात्मिक बैठक यामुळे जीवन घडत गेल्याबद्दल डाॅ.घाणेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.त्यांनी केलेल्या प्रदीर्घकालीन,भारतासह विविध देशांतील विश्वजोडो अभियानाच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकून; सबकुछ मधुसूदन ह्या विश्वविक्रमी एकपात्री कार्यक्रमाची झलकच सादर करुन डाॅ.घाणेकर यांनी उपस्थितांची मने जिंकली.डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या या यशस्वी वाटचालीबद्दल वर्ल्ड व्हिजनचे संस्थापक,अध्यक्ष प्रा.नागेश हुलावळे, अक्षरआनंद इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.योगेश जोशी,मधुरंग संस्थेच्या निमंत्रक प्रा.प्रतिमा काळे,तितिक्षाच्या संस्थापक,अध्यक्षा प्रिया दामले यांनी डाॅ.घाणेकर यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.