शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२८ जानेवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीची युवानेते बापू दिनकर कातळे यांच्या वतीने रावेत, किवळे, विकास नगर परिसरातील नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम नेहमीच राबविले जातात. आपल्या प्रभागातील नागरिकांना शासन-प्रशासन वतीने राबविण्यात येणारे योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळावा या हेतूने युवा नेते बापू दिनकर कातळे हे सामाजिक उपक्रम राबवीत असतात. याला अनुसरूनच पिंपरी चिंचवड मधील प्रभाग क्रमांक 16 किवळे या भागामध्ये बालिका दिनानिमित्त राष्ट्रवादीचे युवा नेते बापू दिनकर कातळे यांच्याकडून सुकन्या योजना मेळावा व आधार कार्ड मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये १०० गरजू व गरीब लहान मुलींचा सुकन्या खाते बापू कातळे यांच्या मार्फत मोफत चालू करून देण्यात येणार आहे. या मेळाव्यास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.
सुकन्या योजनेचा लाभ जास्तीत जास्त मुलींना मिळावा या हेतूने सदर उपक्रम राबविण्यात आल्याचे यावेळी युवा नेते बापू दिनकर कातळे यांनी सांगितले.