शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी पक्षाचे शहर उपाध्यक्ष अकबर मुल्ला हे आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज झाले असून त्यांनी आपल्या प्रभागात नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी बैठका सुरू केल्या आहेत.
या बैठकीचे आयोजन करताना त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, राष्ट्रवादी पक्षाच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या आदेशानुसार दर महिन्याच्या शनिवारी बैठकीचे आयोजन करणार असून प्रभाग क्रमांक २९ मधील सामान्य नागरिक, हातगाडी पठारी, फेरीवाले यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम तसेच प्रभागातील सोयीसुविधा, अडीअडचणी तसेच विजेचा प्रश्न, आजचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न अशी अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार असून पहिली बैठक ५ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. या बैठकीत सामान्य नागरिकांच्या अनेक अडचणी समोर आल्या. या सर्व अडचणी आपण सोडविणार असून मतदारांनी २०१७ मध्ये जी चूक केली ती आता २०२२. मध्ये करू नये, असेही प्रभागातील नागरिकांना अकबर मुल्ला यांच्या वतीने सांगण्यात आले.
त्यांच्या या बैठकीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पहावयास मिळाला. नागरिकांनी आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अकबर मुल्ला यांच्यासमोर आपले प्रश्न मांडले. व हे सर्व प्रश्न आपण सोडविण्यासाठी सर्व तरी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.