शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०७ फेब्रुवारी) ;- पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा वाढदिवस येत्या १५ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराचे उपाध्यक्ष नवनाथ मारुती ढवळे यांच्यावतीने पुनावळे परिसरात पुनावळे महोत्सव २०२२ चे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवामध्ये प्रामुख्याने बाल जत्रा आणि हस्तकला प्रदर्शन तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सव हा दि. ७ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी पाच ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत नवनाथ मारुती ढवळे यांचे जनसंपर्क कार्यालय सिद्धशिला ईला सोसायटीसमोर, काटे वस्ती रोड पुनावळे येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, तसेच खाऊया, खेळूया, आपली संस्कृती जपून आनंदी होऊया, असे आवाहन नवनाथ मारुती ढवळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.