शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१२ फेब्रुवारी) :- ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्विकॄत सदस्य अनिकेत राजेंद्र काटे आयोजित व श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल यांच्या सहकार्याने प्रभाग क्र.४३ दापोडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयासमोर श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे नागरिकांसाठी दि. २६ /०१/२०२२ तसेच २७/०१/२०२२ या दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये शुगर,रक्तदाब, तसेच ,नेत्र तपासणी करण्यात आली.
सदर शिबिरात नेत्र तपासणी करण्यात आलेल्या ३५० नागरिकांना मोफत चष्मे दिनांक १०/०२/२०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता स्विकॄत नगरसेवक अनिकेत राजेंद्र काटे यांचे जनसंपर्क कार्यालय माता शितळादेवी मंदिर चौक, एच.पी.पेट्रोल पंपालगत, दापोडी पिंपळे गुरव रोड,दापोडी पुणे १२ या ठिकाणी वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मा.विरोधी पक्षनेते राजाभाऊ काटे, स्विकॄत नगरसेवक अनिकेत राजेंद्र काटे , सोपान काटे , संजय भागाडुते, प्रदीप पोतदार, कुमार मते, नितीन बोधे,अनिल कांबळे,निलेश भाऊ दोडमणी, या कार्यक्रमास शुभांगी राजेंद्र काटे, शुभांगी कदम, वैशालीताई सागळे,प्रमिलाताई घुमे,लिलाताई मोरे,राघिनीताई कांबळे,आदी महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत होते.