शबनम न्यूज / पुणे
पुण्यात लोकांनी महत्वाची कामे असतील तर ती सकाळी ११ वाजण्याच्या आतच पूर्ण करावी. त्यानंतर दुपारी १२ वाजल्यापासून लॉकडाऊनची आणखी कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
राबविण्यात येत असलेल्या लॉकडाऊनचे चांगले परिणाम दिसून येऊ लागले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. असे असले तरी अजूनही ही संख्या खूप कमी झालेली नाही. त्यामुळे शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक होणार आहे. त्यामुळे पुण्यात लॉकडाऊन करण्याचा गांभीर्याने विचार करावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने नुकतीच राज्य शासनाला केली होती. त्यामुळे पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या चर्चेत आली आहे. संपूर्ण लॉकडाऊन करण्याची वेळ येण्यापूर्वीच आधीच खबरदारी घ्यावी, या हेतूने शहर पोलिसांनी आता नाकाबंदीची व्याप्ती वाढविली आहे.
Advertisement