शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१२ फेब्रुवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात वारंवार विजेचा पुरवठा खंडित होण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या वाढत्या वीज पुरवठा खंडीत समस्या बाबत महावितरण विभागाशी या परिसरातील नगरसेविका अश्विनी संतोष जाधव व नेहमी सामान्य नागरिकांच्या मदतीला धावून येणारे जनसेवक संतोष जाधव यांनी वारंवार या समस्येबाबत निवारण करण्यासाठी निवेदने दिली. त्याचा पाठपुरावा केला. परंतु सदर समस्या सुटत नसल्याने जनसेवक संतोष जाधव यांनी थेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मोशी परिसरातील वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तसेच याबाबत च्या उपाययोजना सुचविल्या व अंडरग्राउंड केबल व काही ठिकाणी ट्रांसफार्मर बसविण्याची मागणी केली या मागणीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ दखल घेत संबंधित महावितरणाच्या अधिकाऱ्यांना फोन करून सदर समस्या त्वरित सोडविण्याचे आदेश दिले.
याबद्दल संतोष जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.