शबनम न्युज | चिखली
गाडी आणि फ्रिज घेण्याकरीता माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहीतेचा शारिरीक आणि मानसिक छळ केला.याला कंटाळून विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.ही घटना रविवारी (दि. ०१ ) रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली. विवाहीतेला हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा गणेश हाके (वय २२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
पती गणेश पांडुरंग हाके ( वय- २८ ), सासू, नणंद, चूलत सासरा शिवाजी केरबा हाके ( वय- ४१) मावस दिर ओमकार गोविंद देवकाते ( वय २५ ) मावस सासरा पांडुरंग विश्वनाथ देवकाते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Advertisement