शबनम न्यूज : पुणे (दि.२८ फेब्रुवारी) :- येरवडा कारागृहातील पोलिस शिपायाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जखमी पोलिस शिपायावर ससून येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
अमोल माने असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्या पोलिस शिपायाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल यांनी काल पहाटेच्या सुमारास ड्युटीवर असताना त्यांच्या जवळील एसएलआर रायफलमधून स्वतः वर गोळी झाडून घेतली. याचा आवाज येताच कर्मचार्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या,अमोल यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच हे पाऊल अमोल यांनी का उचलले,हे अद्याप पर्यंत समजू शकले नाही. अमोल माने हे मूळचे अहमदनगर येथील असून ते २०१५ कारागृह पोलिसात भरती झाले होते.
प्रतिनिधि,
दिलीप सोनकांबळे