शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२८ फेब्रुवारी) :- नवनगर शिक्षण मंडळ आकुर्डी संचलित, श्री सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी पुणे ३५ या शाळेत २८ फेब्रुवारी,राष्ट्रीय विज्ञान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला/पोस्टर,निबंध व वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धांमध्ये भरघोस सहभाग घेतला.
चित्रकला स्पर्धेत ८०,रांगोळी स्पर्धेत ५० विद्यार्थ्यांनी,निबंध स्पर्धेत ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः लहान-मोठे वैज्ञानिक प्रयोग उत्सहाने करून दाखवले.विज्ञान विषय प्रमुख म्हणून प्रतिमा काळे मॅडम,बाह्य स्पर्धा विभाग प्रमुख सौ.जाधव सुकन्या मॅडम यांनी मुलांसाठी या स्पर्धांचे आयोजन केले होते.
स्पर्धेसाठी विज्ञान शिक्षक सौ.सारिका आस्मर मॅडम,श्री.वांगेकर सर,श्री.पोंदे सर,श्री.प्रदीप गायकवाड सर यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी नवनगर शिक्षण मंडळ आकुर्डीचे संस्थापक श्री. गोविंदराव दाभाडे सर,मुख्याध्यापिका सौ.साधना दातीर मॅडम,उपप्राचार्य,श्री. बच्चे सर, पर्यवेक्षक श्री.काळोखे सर,पर्यवेक्षिका सौ.आहेर मॅडम उपस्थित होते.कार्यक्रमासाठी इयत्ता ५ वी ते ७ वी चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.