वृत्तसंस्था
शबनम न्यूज : ०४ मार्च
क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न (Shane Warne) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे .त्यामुळे अवघ्या क्रेकेट जगतावर शोककळा पसरली. ते ऑस्ट्रेलियासह जगातील महान गोलंदाज होते. एक प्रकारे फिरकी गोलंदाजीचे बादशहाच. त्यांना जादूगार शेन वॉर्न या नावानेही संबोधले जात असे.
शेन वॉर्नच्या निधनाची बातमी वीरेंद्र सेहवाग याने आपल्या ट्विटद्वारे दिली आहे. वॉर्न हे ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज आहे. वॉर्नने ऑस्ट्रेलियाला फिरकीच्या जोरावर अनेक विजय मिळवून दिले होते. तसेच वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.
शेन वॉर्नने १९९२ मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जानेवारी २००७ मध्ये त्यांनी सिडनीमध्येच इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
Cannot believe it.
One of the greatest spinners, the man who made spin cool, superstar Shane Warne is no more.
Life is very fragile, but this is very difficult to fathom. My heartfelt condolences to his family, friends and fans all around the world. pic.twitter.com/f7FUzZBaYXAdvertisement— Virender Sehwag (@virendersehwag) March 4, 2022
Shane Warne, one of the world's greatest cricketers, has died of a suspected heart attack at the age of 52
Advertisement— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 4, 2022