शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०९ मार्च) :- आमदारांची मनमानी, हुकूमशाही तसेच भाजपा मधील भ्रष्ट कारभाराला कंटाळून निष्ठावंत गटातील नगरसवेक रवि लांडगे आणि संजय नेवाळे यांनी आज आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यापूर्वी वसंत बोराटे, तुषार कामठे, माया बारणे, चंदा लोखंडे या चार नगरसेवकांनी भाजपाला रामराम ठोकला.
भाजपा नेते आणि विधानसभेतील विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी थांबविण्याचा प्रयत्न करूनही रवि लांडगे यांनी पक्ष सोडल्याने आमदार महेश लांडगे आणि भाजपाला मोठा धक्का बसला. गळती सुरूच राहिल्याने भाजपाचे नेते चिंताग्रस्त आहेत. सुमारे २२ नगरसेवक भाजपा सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. भाजपा सोडणारे बहुतांश नगरसवेक राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याने राष्ट्रवादीची बाजू भक्कम झाली आहे.
Advertisement