यात्रेत 500 महिलांनी घेतला सहभाग
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०९ मार्च) :- पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी परिसरातील माजी स्वीकृत सदस्य राष्ट्रवादीचे युवा नेते सागर खंडू शेठ कोकणे व सौ प्रियंका सागर कोकणे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 33 मधील महिला भगिनींसाठी मोफत कोल्हापूर दर्शन यात्रेचे आयोजन नुकतेच संपन्न झाले. या यात्रेमध्ये प्रभाग क्रमांक 33 मधील 500 महिला भगिनी यांनी सहभाग घेतला.
मागील दोन वर्षापासून कोरोना सारखा विषाणू संपूर्ण जगाला त्रस्त करत असताना आपल्या देशातही लॉकडाऊन सारख्या महाभयानक परिस्थितीला सामोरे जावे लागले या कठीण काळात नागरिकांना घराबाहेर पडणे अडचणीचे झाले होते. यातही महिला भगिनींना या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या सर्व गोष्टींची दखल घेत युवा नेते सागर खंडू कोकणे व त्यांच्या सौभाग्यवती यांच्या वतीने प्रभागातील महिलांसाठी कोल्हापूर यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत विविध देवस्थानांना भेट देण्यात आली. यात्रेच्या निमित्ताने अनेक महिला एकत्र आल्या या महिलांनी आपला आनंद व्यक्त करीत युवा नेते सागर खंडू कोकणे व त्यांच्या सौभाग्यवती प्रियंका कोकणे यांचे आभार व्यक्त केले.