शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१७ मार्च) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने केंद्रशासन व राज्य शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येत असणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये लाभार्थी ठरलेल्या व प्रथम स्वहिस्सा रक्कम भरलेल्या चऱ्होली प्रकल्पातील लाभार्थ्यांना पुढील ४०% आणि बोऱ्हाडेवाडी प्रकल्पातील पात्र लाभार्थ्यांना ८०% स्वहिस्सा रक्कम भरण्याची मुदत दि. १५ एप्रिल २०२२ पर्यंत वाढविण्यास आयुक्त / तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली असुन या मुदतीत लाभार्थ्यांनी आपली स्वहिस्सा रक्कम भरावी असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये चऱ्होली ४०% आणि बोऱ्हाडेवाडी ८०% स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामध्ये चलन प्राप्त करुन दि.१५/०४/२०२२ रोजी पर्यंत स्वहिस्सा रक्कम भरावी, अन्यथा लाभ रद्द करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. या बाबतची माहिती व निवड झालेल्या लाभार्थ्यांचे नावाची यादी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग २०५ व्यापारी संकुलन,भाजी मंडई शेजारी चिंचवडगाव पुणे – ३३ या कार्यालयाच्या दर्शनी भागावर नागरीकांकरीता सुचना फलकावर लावण्यात आलेली आहे. तरी दि.१५/०४/२०२२ रोजी पर्यंत लाभार्थ्यांनी स्वाहिस्सा रक्कम भरावी असे आवाहन करण्यात येत आहे.