शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२८ मार्च) :- पिंपरी-चिंचवड शहरातील सेव अर्थ , प्लास्टिक प्रदूषण विरुद्ध एक लढा या सामाजिक संस्था वतीने एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे झाडांच्या पानांनी आणि फुलांनी सेव अर्थ हे नाव काढून समाजातील नागरिकांना आपली पृथ्वी ही फुलांसारखी सुंदर व पानासारखी हिरवी असून तिला जोपासायला हवी ही आपली काळाची गरज आहे असा संदेश या संस्थेच्या संस्थापिका प्रियंका मुंडे – तिडके यांनी नागरिकांना दिला.
या सामाजिक संस्थेच्या शीतल सीताप व प्रियंका मुंडे या दोघांनी मिळून सुरू केलेली ही प्लास्टिक प्रदूषण विरुद्धची मोहीम पिंपरी-चिंचवड शहरातील जाधव वाडी, मोशी परिसरातील सोसायट्यांमध्ये पोहोचविली आहे, गंधर्व सोसायटी मध्ये घेतलेल्या कार्यक्रमांमध्ये या परिसरातील जनसेवक निखिल बोऱ्हाडे व पिंपरी चिंचवड मोशी चिखली हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी या कार्यात मोठा पुढाकार घेतला असून त्यांनी स्वतःहून या कार्यात संस्थेला सहकार्य केले आहे.
तसेच निखिल बोऱ्हाडे यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये डस्टबिन वाटप केले आहे या परिसरातील तसेच जास्तीत जास्त सोसायट्यांमध्ये प्लास्टिक कचरा जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डस्टबिन पुढील काळातही वाटप करणार असल्याचे आश्वासन निखिल बोऱ्हाडे यांनी या कार्यक्रमात दिली, प्रियंका तिडके यांनी आपला संदेश देताना सांगितले की प्रत्येक नागरिकांनी या कार्यात सहभाग घेत प्लास्टिक प्रदूषण विरुद्ध हि मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे.