भोसरीतील बारसे कुटुंबाची आदर्श शिक्षण संस्थेची स्वतःच्या मालकीची इमारत मोफत कोविड सेंटर साठी घेण्यासाठी दिला होता प्रस्ताव
शबनम न्यूज / पिंपरी
नुकतेच भोसरी मध्ये जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याबद्दलच्या आणि त्याच बरोबर त्यासाठी आवश्यक असलेल्या निविदा ओपन करण्याच्या कामास सुरुवात झाली होती.
या माहितीच्या आधारे अनावश्यक असणारा खर्च टाळला जावा यासाठी नगरसेविका प्रियांका बारसे यांनी बारसे कुटुंबाच्या मालकीची अद्ययावत इमारत महानगरपालिकेस कोविड सेंटर विथ ऑक्सी बेड सुरू करण्यासाठी मोफत देण्यास तयार असल्याचे कळविले होते.
आठ दिवसापासून आयुक्त पिचिमनपा यांच्या कडील निरोपाची वाट पाहून आज स्वतः नगरसेविका प्रियांका बारसे आयुक्त यांची समक्ष भेट घेतली .
भोसरीतील जम्बो कोविड सेंटर साठी मदत म्हणुन मोफत आदर्श शिक्षण संस्थेची इमारत वापरावयास घ्या असे सांगण्यास गेल्या असता आयुक्तांनी सांगितले की भोसरीतील जम्बो सेंटरचे काम रद्द करण्यात आले असून या ठिकाणी जंम्बो कोविड सेंटर उभारण्यात येणार नाही. तशी सध्या आवश्यकता नाही.
पण तरीसुद्धा भविष्यकाळात जर येथे कोविड सेंटर उभारण्याची गरज भासली किंवा भविष्यातील कोरोना चा प्रादुर्भाव पाहता लहान मुलांच्या कोविड सेंटर ची सुद्धा मागणी आता समाजातून होत आहे अशा वेळी जर कोविड सेंटर करण्याची वेळ आलीच तर निश्चितच आमच्या आदर्श शिक्षण संस्थेच्या इमारतीचा विचार निश्चित करावा.
आमची आपल्याकडं कोणतीही आर्थिक अपेक्षा नाही असे स्पष्टपणे नगरसेविका प्रियांका बारसे यांनी आयुक्तांना सांगितलेले आहे.