शबनम न्यूज ( पिंपरी चिंचवड )
चिंचवड एमआयडीसी जे पी 170 कस्तुरी मार्केट अजंठा नगर या ठिकाणी अंध अपंग विकास संस्था गेले अनेक वर्षापासून कार्यरत आहे या ठिकाणी अंध अपंग नागरिकांसाठी राहण्याची व कामकाजाची व्यवस्था आहे या संस्थेच्या इमारतीला चारी बाजूंनी सीमा भिंत आहे या सीमा भिंतीच्या डाव्या बाजूने 40 फूट रस्त्याचे नियोजन आहे या नियोजित रस्त्याच्या जागेवर येथील नागरिकांनी पत्रा शेड उभा करून हॉटेल व काही दुकाने उभारण्याचे काम सुरू केले आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असे अनधिकृत बांधकाम उभारण्याचे काम सुरू आहे हा नियोजित रस्ता अनेक वर्षांपासून रखडला आहे या अतिक्रमणामुळे हा रस्ता पूर्ण होण्यास आणखी विलंब वाढताना होत आहे तरी कृपया आपण या ठिकाणी आपले अधिकारी व पाहणी पथक पाठवून त्या अतिक्रमणावर कारवाई करावी अशी मागणी अंध अपंग संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे कारण या ठिकाणी अंध अपंग नागरिकांची येजा असते त्या ठिकाणी होणाऱ्या अतिक्रमणामुळे या अंध अपंग व्यक्तींना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागेल हे अडचण लक्षात घेता आपण त्वरित या अतिक्रमणावर कारवाई करावी करण्याची मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.असे निवेदन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिले आहे .