शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.३१ मार्च) :- पिंपरीगावातील प्रसिद्ध उद्योजक व शुभम उद्योग या कंपनीचे मालक हनुमंत वाघेरे यांनी आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ सहारा वृध्दाश्रमास एक महिन्याचे धान्य आज प्रदान केले.
श्री वाघेरे हे एक वर्षाचे असतानाच त्यांच्या आई गजराबाई यशवंत वाघेरे यांचे निधन झाले होते. आईचा चेहराही पहायला न मिळाल्याने व फोटो देखील उपलब्ध नसल्याने ते दरवर्षी अनाथ निराधार आजी-आजोबांसाठी मदत करत असतात.
बुधवारी त्यांनी आपली पत्नी मनिषा व मुलांच्या उपस्थित आंदर मावळ मधील कुसवली या गावात असलेल्या सहारा वृध्दाश्रमास धान्य दिले.यावेळी प्रबोधनकार शारदाताई मुंढे,सहाराचे संचालक विजय जगताप आदी उपस्थित होते.
Advertisement