शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१९ एप्रिल) :- पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्वांचे लाडके आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. त्यांच्यावर बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. लक्ष्मण जगताप यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आपल्या लाडक्या आमदारांनी लवकर बरे व्हावे, परत पूर्वीसारखे कार्यरत व्हावे, याकरिता त्यांचे चाहते विविध धार्मिक स्थळावर प्रार्थना करीत आहेत आमदार लक्ष्मण जगताप यांना दीर्घायुष्य लाभो, याकरिता अनेक कार्यकर्ते,चाहते देवाकडे साकडे घालत आहेत.
आज दि १९ मंगळवार रोजी अंगारखी चतुर्थीचा योग साधून चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांना दीर्घायुष्य लाभो ह्या करिता भारतीय जनता पार्टी चे उपाध्यक्ष काळूराम बारणे यांच्या नेतृत्वाखाली,माजी स्वीकृत प्रभाग सदस्य संदीप गाडे व त्यांची पत्नी व मित्र परिवारा कडून शिवशक्ती गणेश मंदिर,भोरडे नगर, थेरगाव या ठिकाणी गणेश यज्ञ, महामृत्यूजय मंत्र व होम हवन करून गणेशाच्या चरणी त्यांचं दीर्घआयुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली, त्या वेळेस सामाजिक कार्यकर्ते सुनिल जगताप, राहुल शिंदे, मोहन पांचाळ, विजय भुसारे,बाळासाहेब जगताप व नरेंद्र ब माने अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना समिती चिंचवड राजू मातेरे, प्रमोद भोसे, उपस्थित होते.