शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१९ एप्रिल) :- पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व बिशप, रेव्हरंड, पास्टर्स, ॲडव्होकेट्स, चार्टर्ड अकौंटन्ट, नामवंत ख्रिस्ती उद्योजक, सामाजीक पुढारी, व सर्व पंथीय ख्रिस्ती समाजाच्या वतीने भव्य पुनरुत्थान रॅलीचे आयाेजन करण्यात आले हाेते. या रॅलीत भाेसरी, दिघी, चाकण, माेशी, आळंदी, येरवडा, विश्रांतवाडी, दापाेडी, देहूरोड, कासारवाडी, पिंपरी – चिंचवड विभागातील ख्रिस्ती बांधव बहुसंख्येने सामील झाले हाेते. सदर रॅली शिवाजी चाैक, लांडेवाडी येथुन प्रारंभ झाली व फायर ब्रिगेड, बापूजी बुवा चौक, मारुती मंदिर, पी.एम.टी. चाैक मार्गे आय्यप्पा मंदिर, भोपते हाॅल (शितल बाग) येथे सांगता झाली. या रॅलीत प्रसिद्ध गाॅस्पल सिंगर पा.अनिलकांत यांनी घोषणा देत सुमधूर गितांद्वारे परमेश्वराच्या अनमाेल प्रितीचे वर्णन केले.
प्रभु उठला आहे, खराेखर उठला आहे या जयघाेषाने आसमंत दुमदुमून गेला. या रॅली मध्ये स्वरसंगीत ख्रिस्ती ब्रास बँड पथक हे विशेष आकर्षण हाेते. या बँड पथकाने अनेक ख्रिस्ती गीते आपल्या शैलीत वाजवुन उपस्थीतांची दाद मिळवली. रॅली मध्ये महिला व तरुणांचा मोठा सहभाग होता.
या रॅलीत बिशप मायकल राज नाडार, बिशप अनिष विजागत, भोसरी पास्टर फेलोशिपचे अध्यक्ष पा.निशीकांत काळे तसेच पिंपरी चिंचवड मधील अनेक पाळक वर्ग उत्स्फूर्तपणे सामील झाले होते.
आंतरराष्ट्रीय गॉस्पल सिंगर पा.अनिल कांत, ब्र.पूर्णा स्वाईन, रेव्ह.सुभाष पाडळे, विधी अधिकारी ॲड.प्रसाद सांगळे, सामाजीक कार्यकर्ते ब्र.सुनिल उबाळे, ब्र.सतिश पटेकर, पा.शेखर डेव्हिड (मुंबई), नगरसेवक संतोष (आण्णा) लोंढे या विशेष पाहुण्यांनी रॅलीची शाेभा वाढवली.
सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन पा.बन्यामीन काळे यांनी केले. या भक्ती पूर्ण वातावरणात पा.निशीकांत काळे यांनी पुनरुत्थान दिना निमित्त पवित्र शास्त्रातून मोलाचे मार्गदर्शन केले तद्नंतर उपस्थित सर्व बिशप, पाळक व मान्यवरांचा सत्कार पुष्पगुच्छ देउन करण्यात आला. यासमयी सलग बारा वर्षे रॅली मध्ये उपस्थित राहणाऱ्या १३ सेवकांना सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. ब्र.पूर्णा स्वाईन आणि ॲड.प्रसाद सांगळे, नगरसेवक श्री.संतोष (अण्णा) लोंढे, ब्र.सुनील उबाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत रॅली कमिटीचे कौतुक करून आभार मानले. शेवटची प्रार्थना बिशप अनिश विजागत यांनी केली व आशीर्वाद पा.निशिकांत काळे यांनी दिला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियाेजन बिशप मायकल राज नाडार व महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद, पिंपरी चिंचवड अध्यक्ष ब्र.डेव्हिड काळे, ब्र.सॅम्युएल बनकर, पा.बन्यामीन काळे, पा.अनीता नायडु, रेव्ह.सचिन भालेराव, सि.वनिता पिल्ले, सि.सिमा पाटील, ब्र.मनोज पिल्ले, ब्र.सॅम्यूएल काळे, ब्र.ब्रिटन नाडार, ब्र.दिलीप गडाख, ब्र.शलमोन काळे, ब्र.स्वप्नील बनकर, ब्र.शाम गोसावी, ब्र.विशाल भालतिलक, ब्र.अमित सूर्यवंशी यांनी केले.