शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ डिसेंबर) :- संपूर्ण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एस. टी. महामंडळ कर्मचा-यांचा गेल्या दिड महिन्यापासून राज्यव्यापी संप सुरु असल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पिंपरी चिंचवड आगारास आज पुन:श्च भेट देऊन एस टी कर्मचा-यांच्या व्यथा जाणून घेत आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला.
महापौर माई ढोरे यांनी आंदोलनकर्त्या एस. टी. कर्मचा-यांचे आंदोलन स्थळी जेवणाची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांना स्वयंपाक गॅस सिलेंडर दिला व कर्मचा-यांची जेवणाची व्यवस्था देखील केली. राज्य सरकारने एस.टी. ने प्रवास करणा-या सर्वसामन्य नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी, तसेच एस.टी. कर्मचा-यांची राज्यशासनात विलनिकरणा संबंधीची आग्रही मागणी पाहता सदरचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा असे मत व्यक्त केले. यावेळी भरत नाईक (वाहक), प्रविण मोहिते (सहाय्यक कारागीर) व आदी एस.टी. कर्मचारी उपस्थित होते.