पिंपरी चिंचवड – ( प्रतिनिधी )
पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी गावात महानगरपालिकेच्या जुन्या रुग्णालयात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण केंद्र सुरू करू नये या मागणीचे निवेदन, शिवसेनेचे शहर संघटक बशीर सुतार यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे. दिलेल्या निवेदनात बशीर सुतार यांनी नमूद केले आहे की आकुर्डी गावातील महानगर पालिकेच्या जुन्या रुग्णालयाचे सर्व कामकाज नवीन रूग्णालयात शिफ्ट करण्यात आले आहे .
त्यामुळे आता जुन्या रुग्णालयात क्षय रोग दुरीकरण केंद्र चे कामकाज सुरू करण्यात येणार असून या केंद्रास आमचा विरोध आहे या परिसरातील नागरिकांना या केंद्राचा त्रास होऊ शकतो त्याचप्रमाणे क्षयरोगाच्या कामकाजामुळे या परिसरातील नागरिक, शाळकरी मुले तसेच धार्मिक स्थळातील भाविकांना तसेच बाजारपेठेतील व्यापारी व नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होऊ शकतो ,त्यामुळे सदर केंद्र या रुग्णालयात सुरू करू नये तसेच या इमारतीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे वाचनालय व करमणूक केंद्र उदाहणार्थ कॅरम बोर्ड , टेबल टेनिस, बुद्धिबळ अशाप्रकारचे इन डोअर खेळ खेळण्यास नागरिकांची सोय करावी ही मागणी आकुर्डी गावातील नागरिक पूर्वीपासूनच सातत्याने करत आले आहे याबाबत आपणास वेळोवेळी निवेदनही देण्यात आले आहे तरी या सर्व मागणीचा विचार करून योग्य ती कारवाई करावी असे बशीर सुतार यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे निवेदन दिल्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी याविषयी सकारात्मकता दाखवत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना बशीर सुतार यांच्या सोबत केंब्रिज स्कूल चे प्रतिनिधी सचिन ढेरंगे, सलीम शेख व लल्लन खान तसेच इतर सहकारी उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी
बशीर सुतार,अध्यक्ष – मुस्लिम समाज विकास प्रतिष्ठाण
संचालक – नागरी सुविधा केंद्र
शहर संघटक – पिं. चिं शहर शिवसेना
विशेष कार्यकारी अधिकारी
सदस्य – पोलीस शांतता कमिटी
मा. अध्यक्ष – आकुर्डी व्यापारी संघटना
सदस्य – केंद्रीय रेल्वे सल्लागार समिती