शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.१२ डिसेंबर) :- जाणता राजा जनसामान्यांचा आधारवड लोकनेते मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नाना काटे सोशल फाऊंडेशन व जीवन ज्योती हॉस्पिटल यांच्या विद्यमाने पिंपळे सौदागर येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे नाना काटे सोशल फाऊंडेशन चे ज्येष्ठ नागरिक श्री. विलास काटे, श्री.उत्तम धनवटे,श्री. अर्जुन काटे,श्री. तानाजी काटे, श्री. पोपट जगताप ,श्री. जगन्नाथ काटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून उदघाटन करण्यात आले.
या शिबिरामध्ये नागरिकांना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व योग्य उपचार, नाडी तपासणी, शरीराचे तापमान तपासणी, BMI, तपासणी, मधुमेह तपासणी, हिमोग्लोबिन चाचणी, रक्तदाब, BSL, ECG तपासणी इत्यादी तपासणी करण्यात आली तसेच या शिबिराचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री.संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते पुढील वैद्यकीय उपचारासाठी नाना काटे सोशल फाऊंडेशन तर्फे डिस्काऊट कार्ड चे वाटप करण्यात आले .यावेळी जीवन ज्योती हॉस्पिटलचे डॉ.अतुल दायमा, डॅा. चद्रंशेखर अन्नदाते,डॅा.राजेंद्र साठे, डॅा. सस्मित जैस्वाल इत्यादी उपस्थित होते.