मुलींच्या शिक्षणासाठी दिला विद्यादान योजनेस धनादेश !!
शबनम न्युज | पुणे
ओम प्रतिष्ठान हे नेहमीच निराधार गरजू व होतकरू मुलांसाठी काम करत असते व एवढेच नव्हे तर त्यांनी आतापर्यंत चौदा मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे तसेच त्यांच्या विविध सामाजिक कार्यक्रमामध्ये देखील सहभागी असतात त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारतीय स्टेट बँकेकडून त्यांना धनादेश सुपूर्त करण्यात आला भारतीय स्टेट बँक देखील नेहमी अशा संस्थांना हातभार लावत असते हे या गोष्टीतून दिसते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय स्टेट बँकेत चे पुणे विभाग प्रमुख व उपमहाव्यवस्थापक जगन्नाथ साहू पुणे पश्चिम विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक हरे रामसिंग पुणे विभागातील कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक अविनाश कुमार पुणे पश्चिम विभागाचे मुख्य व्यवस्थापक मिलिंद नाईक तसेच बँकेच्या चिंचवड शाखा चे प्रमोद ढेरे समीक्षित शेडगे व स्नेहा पांडा विद्यादान योजनेच्या संस्थापिका सौ.वनिता सावंत, अध्यक्ष डॉक्टर सोनाली पाटील व सेक्रेटरी विद्या महाजन अनिता शिंदे मॅडम ,शितल मॅडम पानसे काका आदी उपस्थित होते.