शबनम न्युज | पुणे
‘तेर पॉलिसी सेंटर ‘ या पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेतर्फे पुणे ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने ‘तेर एन्व्हायरॉथॉन २०२२’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . ५ जून जागतिक पर्यावरण दिनी ही स्पर्धा होणार आहे. अॅमॅच्युअर अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा होत आहे.’पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश या स्पर्धेतून दिला जाणार आहे.सर्वांनी या स्पर्धेत सहभाग घेवून पर्यावरण दिन साजरा करावा,असे आवाहन तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक डॉ विनिता आपटे यांनी केले आहे.’पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. त्या जबाबदारीची जाणीव व्हावी, या उद्देशाने आयोजित केलेला हा उपक्रम असल्याने त्याला सहकार्य करायला आनंद वाटतो ‘,असे ग्रामीण पुणे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आणि अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे यांनी सांगितले.
३ किलोमीटर ,५ किलोमीटर आणि १० किलोमीटर या प्रकारात ही स्पर्धा होणार आहे. १८ वर्षाखालील वयोगट ,१९ ते ३५ वयोगट ,३५ ते ५० वयोगट ,५१ ते ६५,६५ पासून पुढील वयोगट तसेच दिव्यांग आणि शिशू अशा गटात ही स्पर्धा होणार आहे.
‘ओन्ली वन अर्थ’ असे या वर्षीच्या पर्यावरण दिनाचे घोषवाक्य आहे .तर ‘ रन फॉर एन्व्हायर्नमेंट ‘ हे या स्पर्धेचे घोषवाक्य आहे . ‘पर्यावरण आणि परिसंस्थेचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे ,हे अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे ‘,असे तेर पॉलिसी सेंटर च्या संस्थापिका डॉ विनिता आपटे यांनी पत्रकाद्वारे सांगितले.
https://www.townscript.com या संकेत स्थळावर नोंदणी करता येईल