शबनम न्युज | पिंपरी
कोणत्याही क्षेत्रात स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी महिला सक्षम आहेत. मात्र, त्यांना संधी मिळाली पाहिजे. नगरसेवक, महापौर, खासदार हा प्रवास केवळ संधी मिळाल्यामुळे यशस्वी होवू शकला. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी आधी महिलांना संधी मिळाली पाहिजे, अशा भावना राज्यसभा खासदार ॲड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केल्या.
प्रसारमाध्यम आणि जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या एक्स्रपेस मीडिया इंटरप्राईझेसच्या पुढाकाराने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा सोहळा पार पडला.
यावेळी भागवत भूषण, ज्योतिषाचार्य पंडित अतुल शास्त्री भगरे, ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे, शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पुजा लांडगे, कुमार प्रॉपर्टीजचे संचालक अमेय जैन, प्रियदर्शनी स्कूल चे मुख्य व्यवस्थापक राजेंद्र सिंग, एक्सप्रेस मीडिया इंटरप्राईझेसच्या संचालिका मनिषा थोरात-पिसाळ, संचालक अधिकराव दिवे-पाटील,भारत केसरी विजय गावडे, ॲडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष सचिन थोपटे, नोटरी असोसिएशन पुणे विभाग अध्यक्ष आशिष लांडगे, पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे प्रमुख किरण गावडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
भागवत भूषण, ज्योतिषाचार्य पंडित अतूल शास्त्री भगरे गुरूजी म्हणाले की, पुरातन काळापासून महिलांना सन्मान दिला आहे. आता जरी महिलांना ५० टक्के आरक्षण असले, तरी देव-देवतांच्या काळापासून स्त्रीला अर्धांगीनी म्हणून मान्यता मिळाली आहे. पुरुषांपेक्षा दोन गुण जास्त महिलांमध्ये आहेत. एक म्हणजे नजर आणि दुसरा गुण आहे स्पर्शज्ञान. असे असतानाही महिलांवरील अत्याचार का होतात? याचे चिंतन झाले पाहिजे. महिलांनीही आपल्या विचारांमध्ये आता बदल केला पाहिजे, असेही भगरे गुरुजी म्हणाले. त्यानंतर जेष्ठ सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी आपला जीवनप्रवास कसा झाला याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एक्सप्रेस मीडिया इंटरप्राझेसचे संचालक अधिकराव दिवे-पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आर.जे. अक्षय यांनी केले. आभार संचालिका मनीषा थोरात-पिसाळ यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सूचित कुलट, निलेश सायनकर, रुपाली विसावे तसेच इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
….या रणरागिणींना मिळाला पुरस्कार
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये , शिल्पा कोटकर (शैक्षणिक) ,शितल अर्जुनवाडकर (उद्योजिका), शितल वर्णेकर (शैक्षणिक/ सामाजिक), प्रेरणा कट्टे (पोलिस), कविता भोंगाळे-कडु-पाटील (शैक्षणिक), , स्नेहा कलाटे (सामाजिक) , मनिषा कुंभार (प्रशासन) , साधना तापकीर (सामाजिक) , भारती विनोदे (महिला सक्षमीकरण), प्रा.कविता आल्हाट (राजकीय), शिल्पा अग्रवाल (उद्योजिका) , रुपाली आल्हाट (महिला सक्षमीकरण) , शितल यादव (सामाजिक), निलिमा जरे (शैक्षणिक/ सामाजिक) , शुभांगी जाधव (सामाजिक), श्रद्धा उदावंत (प्रशासकीय), प्रियंका बारसे (आदर्श नगरसेविका), सारिका पवार (महिला सक्षमीकरण), राजश्री गागरे (उद्योजिका), सुजाता बोराटे (महिला सक्षमीकरण), सेफाली कुमावत (मेकअप अर्टीस्ट) यांच्यासह (आदर्श स्कूल) गुरूवर्य ॲकॅडमी स्कूल, सक्षम सोशल फाउंडेशन मोशी , (कलाक्षेत्र) थिएटर वर्कप कंपनी या संस्थांनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रियदर्शनी स्कूल, कुमार प्रॉपर्टीज, सोनिगरा कॉर्प,लोट्स ग्रुप यांचे सहकार्य लाभले.