पिंपरी | शबनम न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर करत टिका केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतकी चितळेसह मुळ पोस्ट लिहिल्याचा आरोप असलेल्या वकिल नितीन भावे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कविता संदेश आल्हाट यांनी याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार केतकी चितळे आणि नितीन भावे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कविता या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी या कार्यालयात असताना त्यांच्या मोबाईलच्या फेसबुक अकाऊंट पाहत असताना राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांना उद्देशुन प्रतिष्ठीत व्यक्तीच्या शारीरीक व्यंगावरून बदनामीकारक व मानहानीकारक मजकुराची आरोपी केतकी चितळे व त्यांचा सहकारी अॅडव्होकेट नितीन भावे यांनी संगणमतकरुन फेसबुकवर पोस्ट करुन समाजामध्ये व्देशाची भावना , तेढ वैमनस्य निर्माण करण्याचे जाणीव पूर्वक कृत्य केले आहे.त्यामुळे केतकी चितळे आणि नितीन भावे यांच्यावर भादंविकलम 505( 2 ) 500, 501 ,153 – अ , आयटी अॅक्ट कलम 71 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.