शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
आकुर्डी मधील जुन्या कर संकलन ऑफिस च्या जागेवर होणाऱ्या सांस्कृतिक भवनाचे काम लवकरात लवकर सुरू करा, असे मागणीचे निवेदन विठ्ठल प्रतिष्ठान चे संस्थापक/अध्यक्ष निखिल उमाकांत दळवी यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, प्रभाग क्रमांक – १४ आकुर्डि मधील खंडेराय भाजी मंडई जवळ असेलेल जूने कर संकलन ऑफिस च्या जागेवर मनपाच्या वतीने नवीन सांस्कृतिक भवन बांधन्यात येणार आहे पण अजुन नवीन सांस्कृतिक भवन बांधन्याच्या कामला सुरवात करण्यात आली नाही बरेच वर्ष झाले जुने कर संकलन ऑफिस ची इमारत बंद पडून आहे नवीन सांस्कृतिक भवनचे बांधकाम कधी सुरु होणार याची विचारणा आम्ही अ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभाग अधिकारी यांच्या केली असता मनपा कड़े या कामा करता तरतूद नसल्याचे त्यांच्या कडून सांगण्यात येत आहे आकुर्डि परिसरात मनपाचा एकही मोठे सांस्कृतिक भवन किवा मोठा हॉल छोटे मोठे कार्यक्रम करण्याकरात उपलब्ध नाही सदर सांस्कृतिक भवन झाले तर गोर गरीब नागरिकांना लग्न समारंभ वाढदिवस संस्कृतिक कार्यक्रम करण्याकरात आल्प दरात मनपा चा हॉल उपलब्ध होईल तरी सदर जागेवर सांस्कृतिक भवन बांधन्याच्या कामाला चालना मिळण्या करात आपन मनपा आयुक्त या नात्याने सांस्कृतिक भवना चे काम सुरु करण्या करात आर्थिक तरतुत द्यावी व सदर सांस्कृतिक भवनाचे काम लवकरात लवकर सुरु करावे, असे ही सदर निवेदनात निखिल दळवी यांनी नमूद केले आहे.