शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी येथील श्री. संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या पिंपरी करंडक २०२२ दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माजी खासदार अमर साबळे यांच्या शुभहस्ते व शिवसेना माजी गटनेते राहुल कलाटे, मा. नगरसेवक संदीप वाघेरे,डॉ.विनायक पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नवमहाराष्ट्र महाविद्यालय क्रीडांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कै.सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ साई सिल्वर संघ, घोरपडी या संघाने दमदार कामगिरी करीत प्रथम क्रमांकाचे १ लाख ११ हजार १११ रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले.
कै .सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या पिंपरी करंडक २०२२ स्पर्धेमध्ये राज्यभरातील एकूण ६४ संघांनी सहभाग घेतला होता. अत्यंत उत्साही वातावरणात हे सामने खेळवले गेले. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक कै.सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ १ लाख ११ हजार १११ रुपये साई सिल्वर संघ, घोरपडी यांनी पटकावले, कै.सविता सुभाष वाघेरे यांच्या स्मरणार्थ द्वितीय क्रमांकाचे ५० हजार रुपयांचे पारितोषिक बारामती वॉरीअर्स क्रिकेट संघ, कै दत्तोबा हरिभाऊशेठ वाघेरे यांच्या स्मरणार्थ तृतीय क्रमांकाचे २५ हजाराचे पारितोषिक झुंजार क्रिकेट क्लब ,व कै.रंगुबाई निवृत्ती कुदळे यांच्या स्मरणार्थ चतुर्थ क्रमांकाचे १५ हजार रुपयांचे पारितोषिक गोकुळवाडा क्रिकेट क्लब यांना मिळाले.तसेच ४० वर्षावरील स्पर्धेसाठी कै. योगेश पोपटराव वाघेरे यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकाचे ३५ हजार रुपयांचे पारितोषिक सुजन क्रिकेट संघ ,उरण यांनी पटकावले,कै.अमोल हिरामण कुदळे व कै.सोमनाथ नंदुकुमार खराडे यांच्या स्मरणार्थ द्वितीय क्रमांकाचे २५ हजार रुपयांचे पारितोषिक निलेशदादा भिंताडे,पुणे यांना मिळाले.
सदर कार्यक्रमादरम्यान पिंपरी गावातील श्री.विशाल हरगुडे,श्री.आदेश नाणेकर,श्री.मंगेश नढे,कु.अभिजित चव्हाण,जेष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर,कु.विशाका बलकवडे,कु. सौ.सुकन्या कांजवणे,डॉ. श्री. राहुलकुमार डोंबळे या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पाटील यांना युवामंच च्या वतीने १,११,१११ रुपयांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मा.आमदार गौतम चाबुकस्वार मा.महापौर.उषा उर्फ माई ढोरे,मा.महापौर.योगेश बहल, मा.नगरसेवक संदीप कस्पटे,मोरेश्वर शेडगे ,जितेंद्र ननावरे,कुणाल लांडगे,सह.शहर अभियंता श्री.संजय कुलकर्णी,उप-अभियंता श्री,राजेश जगताप,बन्सल साहेब,वस्ताद दत्तोबा नाणेकर,नथू शिंदे,प्रविण कुदळे,नंदू बलकवडे,शंकर रसाळ,संजय गायखे,रामभाऊ कुदळे, रंजनाताई जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने दिनांक २१ मे ते २७ मे या दरम्यान क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली होती.कार्यक्रमाचे नियोजन राजेंद्र वाघेरे, संदीप नाणेकर, अध्यक्ष हरिष वाघेरे,किरण शिंदे,सचिन वाघेरे,आकाश चव्हाण,मयुर कचरे,मयुर बोडगे,विठ्ठल जाधव,राजेंद्र मांडगे,गणेश मंजाळ यांनी केले.