शबनम न्यूज | पिंपरी
देशाचे माजी कृषिमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या संकल्पनेतून राज्यभर महाराष्ट्र यूथ कार्निवल (मायोका) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची पश्चिम महाराष्ट्र व पुणे विभागाची उपांत्य फेरी दिनांक 30 मे रोजी पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृह येथे होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष यश साने यांनी दिली.
- ही स्पर्धा या स्पर्धेची प्राथमिक फेरी डिसेंबर व जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व महानगरपालिका क्षेत्रात घेण्यात आली होती. या स्पर्धे अंतर्गत मॉडलिंग, नृत्य, गायग, चित्रकला अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या स्पर्धकांची उपांत्यफेरीत विभाग स्तरावर घेण्यात येणार आहे. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यातून प्राथमिक फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांची उपांत्य फेरी पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात ३० मे रोजी सायंकाळी चार ते आठ या वेळात होणार आहे. या स्पर्धेला एकूण पंचवीस लाखांची बक्षिसे ठेवण्यात आली असून, विभाग स्तरावर निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी नंतर पुणे येथे होणार आहे. या उपक्रमाला राज्यातील विद्यार्थ्यांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला आहे अशी माहिती साने यांनी दिली. या स्पर्धेच्या निमित्ताने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपांत्य फेरीला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Advertisement