शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
आपल्या रहाटणी पिंपळे सौदागर साठी अभिमानास्पद बाब. पिंपळे सौदागर मध्ये राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाची जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क याच्याशी थेट मैत्री जमलीये, एलॉन मस्क यांच्या नामांकित टेस्ला या कंपनी बाबत ट्विटर द्वारे काही सूचना व प्रश्न विचारले त्याच्या या गोष्टीस एलन मस्क यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्या दोघांमध्ये गेल्या ४ वर्षापासून घट्ट मैत्री जमली, तसेच पुढील शिक्षणासाठी प्रणय अमेरिका येथे जाणार असून तेथे एलन मस्क यांच्याशी त्याची भेट होणार आहे. ही माहिती कळताच कु. प्रणय पाठोले याला बोलवून यांचा लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचे लोक माझा सांगती हे पुस्तक व शाल श्रीफळ, पुषपगुच्छ भेट देवून मा. विरोधी पक्षनेते नगरसेवक श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते त्यांचां सन्मान करण्यात आला व त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या सन्मान प्रसंगी नामांकित ग्रामर अमेरिका या कंपनीचे क्वालिटी हेड श्री. सतिश डोंगरे व कु. प्रणय चे वडील श्री. प्रशांत पाठोले उपस्थित होते.