शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेहमीच कार्यकर्त्यांना पाठिंबा मिळत असतो. यातून कार्यकर्ते समाजामध्ये आदर्श निर्माण होईल असे काम करतात. कार्यकर्त्यांना पक्षातून चांगली पद देऊन त्यांना बळ दिले जाते असे मत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्रा.कविता आल्हाट यांनी नुकतेच व्यक्त केले.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या नूतन कार्यकारिणीचा पदवाटप समारंभ खराळवाडीतील पक्ष कार्यालयात पार पडला. पक्षाच्या विभागीय अध्यक्ष वैशाली नागवडे, पिंपरी चिंचवड निरीक्षक उज्वला शेवाळे , शहर अध्यक्ष अजित गव्हाणे , माजी महापौर व ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलाकारिणीच्या पद नियुक्त्या देण्यात आल्या. कार्याध्यक्ष जगदीश शेट्टी, युवक अध्यक्ष इमरान शेख , युवती अध्यक्ष वर्षा जगताप , माजी नगरसेविका माई काटे, पौर्णिमा सोनवणे, तीनही विधानसभेच्या अध्यक्ष , कार्याध्यक्ष व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.यावेळी शहर व विधानसभा कार्यकारणी मिळून एकूण 440 महिला पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली . विशेषतः महिला क्रीडा सेल , महिला डॉक्टर सेल , महिला सहकार सेल , नव्याने निर्माण करण्यात आले .
यामध्ये क्रीडा सेल अध्यक्षपदी समिता गोरे, सहकार सेल अध्यक्षपदी मनीषा तरडे, डॉक्टर सेल अध्यक्ष म्हणून वर्षा माळी यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी प्रा. कविता आल्हाट म्हणाल्या, आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील महिला संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे.पक्षाचे काम, ध्येय धोरणे जनमाणसात पोचवण्याचे काम ही महिला शक्ती करणार आहे. या महिला संघटनांच्या माध्यमातून येत्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर पालिकेमध्ये निवडून येईल या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत.
यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी मार्गदर्शन केले. पदवाटप कार्यक्रमाचे आयोजन प्रा. कविता आल्हाट यांनी केले.