शबनम न्युज | पुणे
दहावीच्या परीक्षेत ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल,अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल,एम.सी.ई.एस. इंग्लीश मिडीयम स्कुल या शाळांनी घवघवीत यश मिळवले आहे.महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, सचिव प्रा. इरफान शेख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
‘अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल’चा निकाल १०० टक्के लागला आहे. ‘अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल’मध्ये कु.शेख उम्मेहनी अकबर ही ९०.२० टक्के मिळवून हायस्कूलमध्ये प्रथम आली. तर कु.मौलवी झेबा अनिस व कु.शेख खतीजा ह्या ८९.२० टक्के गुण मिळवून दुसऱ्या आल्या.कु.शेख नाजनीन नियाज ही ८८.६० गुण मिळवून तिसरी आली,अशी माहिती मुख्याध्यापक गफ्फार सय्यद यांनी दिली.
अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल’चा उर्दू माध्यमाचा निकाल १०० टक्के लागला आहे. शेख अबुतालिब मोहम्मद नियाज हा ८८.४० टक्के गुण मिळवून प्रथम, तर द्वितीय क्रमांकाचा मडकी खलील कादीर याला ८७.६० टक्के गुण तर शेख मोहम्मद झैद नुरुलेन याला ८७.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळाला.
अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल’चा इंग्रजी माध्यमाचा निकाल ९९.११ टक्के लागला आहे.‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल’मध्ये इंग्रजी माध्यमाची शाह अमिना इमामुद्दीन ही ८७.६०टक्के मिळवून हायस्कूलमध्ये प्रथम आली. द्वितीय क्रमांकाची शाह हुरिया आसिफ हिला ८७.२० टक्के गुण तर तृतीय क्रमांकाच्या अन्सारी मोहम्मद हुजैफा तय्यब याला ८६.८० टक्के गुण मिळाले,अशी माहिती मुख्याध्यापक परवीन शेख यांनी दिली.
एम.सी.ई.एस.इंग्लीश मिडीयम स्कुलचा निकाल १०० टक्के लागला.हन्नुरे नोमान मोहम्मद शरीफने ९१.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.शाह मोहम्मद शोएब साहेब हुसेन याने ९१ टक्के मिळवून दुसरा क्रमांक मिळविला.शेख सारा झहीर आणि तांबोळी सबिया अब्दुल रौफ यांनी ९०.२० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकाविला,अशी माहिती मुख्याध्यापिका श्रीमती शिरीन खान यांनी दिली.