शबनम न्युज | नवी दिल्ली
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर आज सकाळीच गोळीबार झाला. दरम्यान त्यांचे निधन झाले आहे. शिंजो हे नारा शहरात भाषण देत असताना हा गोळीबार झाला.पोलिसांनी संशयित हल्लेखोराला अटक केली असून आबे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंजो आबे भाषण करत असताना गोळीबार झाल्यानंतर जखमी होऊन खाली कोसळले. तसंच शिंजो आबे खाली कोसळल्यानंतर रक्तस्त्राव होत असल्याचंही दिसून आलं असंही स्थानिक पत्रकारानं म्हटलं आहे. शिंजो आबे भाषण करत असताना त्यांच्यावर मागून दोन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Advertisement