शबनम न्युज | मुंबई
खासदार संजय राऊत यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. मेधा किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून संजय राऊत यांना अटक वॉरंट जारी करण्यात आलेले आहे. अशी माहिती समोर येत आहे. संजय राऊत यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून अटक वॉरंट जारी करण्यात आलेले आहे. टॉयलेट घोटाळाप्रकरणी वारंवार तारखा देऊनही कोर्टात हजर न राहिल्याने मेधा सोमय्या यांनी पोलीस तक्रार केली होती. त्यानुसार, आता संजय राऊत यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.. मात्र हे जामीनपात्र वॉरंट आहे. त्यामुळे आता संजय राऊत जामीन मिळवण्यासाठी धावाधाव करतात का हे बघणं महत्त्वाचं ठरेल.
Advertisement