शबनम न्युज / पिंपरी
आज राष्ट्रवादी युवती काँग्रेस पिंपरी विधानसभेच्या युवती कार्याध्यक्ष लालबी शेख लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरीमध्ये विविध ठिकाणी गरीब असणारे व निराधार असणारी लहान मुले तसेच बंधू आणि भगिनी यांना फुड पॅकेटचे वाटप करण्यात आले.
Advertisement
त्यामध्ये चिंचवड, मोरवाडी स्टेशन,निगडी ,आकुर्डी अशा विविध ठिकाणी पॅकेटचे वाटप करण्यात आले होते. त्यानिमित्ताने कार्यक्रमास युवती अध्यक्ष वर्षा जगताप, लालबी शेख लोखंडे, अजय चव्हाण,नेहा पडवळ,शालाका बनकर, मनाली कुटे,राजश्री अहिरे,रविराज काळे,अरविंद लोखंडे, मंगेश पवार, पीटर जाधव, सूर्यकांत सातपुते,अंकित,अशोक भडकुम्बे, इत्यादींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन लालबी शेख लोखंडे यांनी केले होते.
Advertisement