शबनम न्यूज ; वृत्तसेवा
मुंबई (दि.२१ जानेवारी) :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये स्थान पटकावलं आहे. एका वृत्तसंस्थेने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. या यादीत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन तिसऱ्या तर महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे चौथ्या क्रमांकावर आहेत आणि केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन पाचव्या स्थानी आहेत.
पाच लोकप्रिय मुख्यमंत्री
1 ओडिशा नवीन पटनायक- 71.1 टक्के
2 पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी – 69.9 टक्के
3 तामिळनाडू एम. के स्टॅलिन – 67.5 टक्के
4 महाराष्ट्र उद्धव ठाकरे – 61.8 टक्के
5 केरळ पिनरयी विजयन – 61.1 टक्के
ओडिशा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, आसाम, छत्तीसगढ आणि राजस्थान या नऊ राज्यांपैकी सर्वात जास्त लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना पहिल्या क्रमांकाची पसंदी मिळाली आहे. पटनायक यांच्या कामावर 71.1 टक्के लोकांनी लोकप्रियता दाखवली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्र्यांच्या यादीत पटनायक यांच्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दुसरा क्रमांक देण्यात आली आहे. त्यांच्या कामगिरीवर 69.9 टक्के जनता समाधानी आहे. तिसऱ्या नंबरवर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आहेत. त्यांच्या कारभारावर 67.5 टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा क्रमांक लागतो. 61.8 टक्के लोक त्यांच्या कामकाजावर समाधानी आहेत.केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन पाचव्या स्थानी आहेत.61.1 टक्के लोक त्यांच्या कामकाजावर समाधानी आहेत.