शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या कविता आल्हाट (पुणे जिल्हा निरीक्षक, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश) यांनी स्वतः कोवीशील्ड कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर कविता आल्हाट यांनी नागरिकांना आव्हान केले आहे की,कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला नागरिकांनी घाबरून जाऊ नये , लसीकरणाची भीती नागरिकांमधून अजूनही गेलेली नाही,कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे कोणताही त्रास होत नाही. ही लस सुरक्षित आहे. तरी सर्व माझ्या प्रभागातील तसेच मोशी मधील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे, जर आपल्याला कोरोनाला हरवायचे असेल तर, लसीकरण करून घेणे अति आवश्यक आहे.
तसेच कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, मास्क घालावे, सामाजिक अंतर ठेवावे तसेच आवश्यक नसताना घराबाहेर पडू नये, विनाकारण गर्दी करू नये, गर्दीची ठिकाणे टाळावी असेही आवाहन कविता आल्हाट यांनी यावेळी केले.